Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सार्वजनिक धूम्रपान करणार्‍यांना 20 हजार रुपयांचा दंड?

Webdunia
गुरूवार, 11 सप्टेंबर 2014 (16:24 IST)
धूम्रपान करणार्‍यांना सावधान! धोक्याची घंटा आहे. धूम्रपान केल्याने आरोग्याला धोका आहेच परंतु आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास खिशालाही चट्टी बसणार आहे. सार्वजनिक ठिकाणी  धूम्रपान केल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठाविण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. 
 
धूम्रपानाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कडक निर्बंध लादण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय विविध प्रस्तावांवर विचार करीत आहे. आणि त्याच दृष्टीने धूम्रपान करण्याचे पात्रता वय वाढविणे, सुटी सिगरेट विकण्यास मनाई करणे आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍या व्यक्तीस जबरी दंड ठोठावणे अशा पर्यायांची व्यवहार्यता तपासली जात आहे.
 
दिल्लीचे माजी मुख्य सचिव रमेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने यादृष्टीने काही शिफारसी आरोग्य मंत्रालयास केल्या आहेत. धूम्रपानासाठीचे किमान पात्रता वय 18 ऐवजी 25 करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास सध्या आकारण्यात येत असलेल्या पाच या दंड रकमेऐवजी 50 हजारांचा दंड ठोठावणे अशा शिफारसी या समितीने केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयही या शिफारसींचा गांभीर्याने विचार करीत असून दंडाची रक्कम 20 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याबाबत सरकार गंभीर आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments