Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सालेमशी लग्न करू द्या, नाहीतर जीव देईन

Webdunia
मंगळवार, 30 जून 2015 (12:16 IST)
ठाणे- 'मला अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी द्या, नाहीतर मी आत्महत्या करीन', अशी धमकी ठाणे जिल्हातील मुंब्रा येथे राहणार्‍या सय्यद बहार कौसर या 25 वर्षीय तरूणीने दिली आहे.
 
बहार कौसर हिने 2014 साली रेल्वे प्रवासात मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार अबू सालेमशी निकाह केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या वृत्तांमध्ये सालेमसोबत बहारचा मॉर्फ केलेला फोटोही छापण्यात आला होता. मॉर्फिंग केलेल्या या फोटोचा आधार घेऊन पोलिसांनी लगेगच चौकशी सुरू केली. हा फॅटो बहारच्या आझमगड, लखनऊ व गुजरातमधील नातेवाइकांना दाखवून पोलिसांनी चौकशी केली. त्यामुळे बहारला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने आता खरोखरच सालेमशी निकाह करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा सहापानी अर्जच तिने टाडा न्यायालयाला केला आहे. 'माझे आयुष्य बरबाद झाले आहे. पोलिसांनी केलेल्या नको त्या चौकशीमुळे माझे नातलग आणि शेजारीही माझ्याशी फटकून वागत आहेत. अनेकांनी माझ्याशी बोलणेही सोडून दिले आहे.
 
माझे जगणे कठीण झाले आहे. माझ्याशी लग्न करायला आता कुणीही भला माणूस तयार होणार नाही. झालाच तरी आमचा संसार किती टिकेल याचा भरवसा नाही. त्यामुळे सालेमशी निकाह करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. त्यासाठी परवानगी द्या' असे तिने अर्जात म्हटले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments