Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुरेश रैनाच्या लग्नात येणार्‍या VIP पाहुण्यांची यादी

Webdunia
शुक्रवार, 3 एप्रिल 2015 (12:28 IST)
स्टार क्रिकेटर सुरेश रैनाचे लग्न आज (3 एप्रिल)ला होणार असून त्याचे आमंत्रण राजनेत्यांपासून क्रिकेट स्टार्सला पाठवण्यात आले आहे. प्रियंका चौधरीसोबत रैना आपल्या जीवनाचा दुसरा डाव खेळण्याची सुरुवात करत आहे.  
 
या स्टार क्रिकेटरने ज्या 270 वीआयपी लोकांना लग्नाचे आमंत्रण पाठवले आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव तर सामील आहेच त्यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार व मित्र महेंद्र सिंह धोनी, संपूर्ण भारतीय क्रिकेट टीम, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव, वीवीएस लक्ष्मण, रवी शास्त्री, सौरव गांगुली, राहुल द्रविड, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना रैनाने आपल्या लग्नात बोलावले आहे.  
 
सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी यांच्या लग्नात जास्त पाहुणे लखनौचे असतील, जेथे रैनाने आपल्या आयुष्याचा जास्त वेळ घालवला आहे. महत्त्वाचे म्हणजे सुरेश रैना आपल्या बालपणाची मैत्रीण प्रियंकाशी 3 एप्रिलला दिल्लीच्या चाणक्यपुरी भागातील ‘द लीला पैलेस होटल’मध्ये लग्न करणार आहे.   
 
लग्नानंतर लगेचच रैना आपले आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायला जाणार आहे, तसेच दुसरीकडे प्रियंका चौधरी, जी   नीदरलँडमध्ये मागील 3 वर्षांपासून बँकेत नोकरी करत आहे, परत नीदरलँडला जाणार आहे. नीदरलँडहून प्रियंका आपले सर्व सामान घेऊन नेहमीसाठी रैनासोबत राहण्यासाठी भारतात येणार आहे. 
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments