बंगळूर : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान हवाई दलात दाखल झाले आहे. या मोठय़ा लढाऊ विमानाचे नाव ‘फ्लाइंग डॅगर्स फोर्टीफाइव्ह’ असे या आहे. हे लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने निर्माण केले असून या विमानामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली विमानाला टक्कर देण्याची क्षमता असणार आहे.
हे लढाऊ विमान 1350 किमी प्रतितास या वेगामध्ये धावू शकणार आहे. ‘तेजस’ या लढाऊ विमानाच्या क्षमतेची तुलना फ्रान्सच्या ‘मिराज 2000’, अमेरिकेतील एफ-16 आणि स्विडनच्या ग्रिपेन या विमानासोबत केली गेली आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या विमानांचे नामकरण ‘तेजस‘ असे केले होते. संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान बनविण्याची मूळ कल्पना 1970 च्या दशकामध्ये पुढे आली. 1980 च्या दशकात त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले. ‘तेजस‘चे पहिले उड्डाण 2001 च्या जानेवारीमध्ये झाले होते.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांसाठीची गेल्या 30 वर्षांची संरक्षण दलांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली.