मृत्यूला चकवा देणारी वीरजवान हनुमंतप्पा कोप्पड यांची प्रकृती गंभीर आहे. हनुमंतप्पा यांच्यावर दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रुग्णालयाने हनुमंतप्पा यांच्या प्रकृतीसंदर्भातील अहवाल लष्कर प्रमुखांकडे सोपवला आहे.पुढील 24 तास हनुमंतप्पांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हनुमंतप्पा यांच्या पत्नी आणि आईसह कुटुंबातील सहा जण दिल्लीत दाखल झाले आहेत.