Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरियाणाचे ऊर्जामंत्री अजय यादव यांचा राजीनामा

Webdunia
बुधवार, 30 जुलै 2014 (11:15 IST)
हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा सरकार विरोधात ऊर्जामंत्री अजय यादव यांनी बंड पुकारले आहे. यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकांत अपयश येऊनदेखील मुख्यमंत्री हुडा यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते, असे यादव यांनी म्हटले आहे. 
 
हुडांच्या नेतृत्वात पक्षाला फटका बसल्याचा आरोप अजय यादव यांनी केला आहे. हरियाणात काँग्रेसला लोकसभेची केवळ एकच जागा जिंकता आली आहे. आपण पदाचा राजीनामा दिला असून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही यादव यांनी सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आपण पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments