Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिमकडा कोसळून एव्हरेस्टवर 12 गिर्यारोहकांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 19 एप्रिल 2014 (11:58 IST)
जगातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखरावर हिमकडा कोसळल्याने 12 नेपाळी‍गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. 10 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सुमारे पाच हजार 800 मीटर उंचीवर गिर्यारोहक अडकले होते, अशी माहिती नेपाळच्या पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.
सर्व गिर्यारोहक उंच शिखरावर चढाई करत असताना हिमकडा कोसळल्याने ही दुर्घटना घडली. सुरुवातीला चार मृतदेह मिळाले होते. मात्र आठ जण बर्फाच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले होते.  या घटनेतील हे सर्वजण २९ हजार फूट उंचीवरील शिखरावर जाण्यासाठी अगोदर दोर लावावेत यासाठी पहाटे गेले होते.
 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments