Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्र साजरी करण्यामागील पौराणिक महत्त्व

Webdunia
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (13:22 IST)
नवरात्राच्या या नऊ दिवसात देवी आईच्या वेगवेगळ्या रूपाची आराधना करतात. वर्षात एकूण चार नवरात्र येतात. त्यामधील दोन अश्या या गुप्त नवरात्री असतात. साधारणपणे लोक चैत्र आणि शारदीय नवरात्र साजरे करतात. या नऊ दिवसात लोक देवी आईला आपल्या घरात वास्तव्यास आणतात. आपणास माहीत आहे का की नवरात्राचा सण का साजरा होतो, काय आहे त्यामागील पौराणिक कथा.
 
देवी आईच्या पूजेसाठी कोणत्याही वेळेची गरज नसते, परंतु नवरात्राचा काळ हा देवी आईच्या पूजेसाठी खास मानला जातो. नवरात्र साजरा करण्यामागे नैसर्गिक कारण असे मानले जाते की या काळात हवामान बदलतं. म्हणून जेव्हा आपण या नऊ दिवसाचे उपवास धरतो त्यावेळी आपल्या शरीराला हंगामानुसार समायोजित करण्यास वेळ मिळतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. आता जाणून घेऊ या पौराणिक महत्त्व.
 
नवरात्र साजरा करण्याशी निगडित दोन कथा आहेत, एक कथा रामनवमीशी निगडित आहे तर दुसरी कथा महिषासुराच्या वधाशी निगडित आहे. 
आधी आपण 
 
महिषासुराची कथा जाणून घेऊया. 
महिषासुर नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस ब्रहम देवांचा उपासक होता. आपल्या तपश्चर्याच्या बळावर त्याने ब्रह्माजी कडून वरदान मिळवलं की कोणीही मनुष्य, देव किंवा राक्षस त्याचा नाश करू शकणार नाही. ब्रहमांकडून मिळालेल्या या वरदानामुळे त्याने सर्वत्र उच्छाद मांडला होता. त्याने निर्दयतेने सर्व लोकात भीती पसरवून ठेवली होती. सर्व देव आणि ऋषी-मुनी त्याला त्रासले होते. तेव्हा परमपिता या विश्वाचे निर्मिते भगवान ब्रह्मा, देवांचे देव महादेव आणि श्री हरी विष्णू यांनी आपल्या शक्तीला एकत्र करून आई दुर्गेची निर्मिती केली महिषासुर आणि आई दुर्गे यांचा मध्ये संपूर्ण 9 दिवस युद्ध सुरू होते. नंतर आई दुर्गेने महिषासुराचा संहार करून सर्वांना त्याचा दहशतीतून मुक्त केले.
 
एका दुसऱ्या कथेनुसार प्रभू श्रीरामांना लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणाशी लढाई जिंकण्यासाठी आई भगवतीचा आशीर्वाद मिळवायचा होता. त्यासाठी त्यांनी रामेश्वर येथे नऊ दिवसांपर्यंत देवी आईची पूजा केली. त्यानंतरच त्याने लंकेवर विजय मिळवली. म्हणून नवरात्राच्या नंतर दसरा सण वाईटावर चांगल्याची विजय म्हणून साजरे करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments