Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २८

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:58 IST)
श्रीगणेशायनमः ॥ श्रीजगंदबाभक्तिकैवारी ॥ उडीघालोनीसंकटपरिहारी ॥ त्वरितीदेवीमंगलागौरी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥
स्कदंहणेदैत्यश्रेष्ठ ॥ धारासुरपरमवरिष्ठ ॥ लब्धवरहोऊन येथेष्ट ॥ सुखावलाअंतरीं ॥२॥
दानवसेनापरिवारित ॥ यमुनाचलींहोऊनीस्थित ॥ राज्यकरितसेनीतियुक्त ॥ महाबलप्राक्रमी ॥३॥
प्रशासनकरोनसर्वदैत्यासी ॥ जेकांपृथ्वीतलवासी ॥ आज्ञांकितकरोनीसर्वांसी ॥ राज्यकरीतपृथ्वीचें ॥४॥
शुक्राचार्य्गुरुच्याविचारें ॥ सनातनधर्माआचरेबरें ॥ सर्वपृथ्वीसीजिंकुनसारे ॥ लोकस्वाधीनठेविले ॥५॥
बलवीर्यमदोद्धत ॥ स्वर्गदिलोकाजिंकूइच्छित ॥ चतुरंगसैनाउद्योगयुक्त ॥ प्रस्थानकरीततेधवां ॥६॥
रथारुढहोऊनीदैत्यनाथ ॥ दैत्यसंगपरिवारित ॥ अमरपुरासीजऊनत्वरिअ ॥ दूतासीपाठवितदेवाकडे ॥७॥
दूतजाऊनीदेवसभेसी ॥ निरोपसांगतइद्रासी ॥ म्हणेधारासुरत्रिलोकासी ॥ शासनकर्तामहाबली ॥८॥
त्याचादुतमीतुम्हासी ॥ त्याचीआज्ञासंगावयासी ॥ आलोंतेंऐकोनीवेगेंसी ॥ मीसांगेनतैसेंकरावें ॥९॥
देवराजातुंनिश्चित ॥ दुष्करकमेंतुजझालेप्राप्त ॥ भोग्यजेसेंसर्वदेवाप्रत ॥ प्रशस्तमनानेंसर्वराज्य ॥१०॥
विरोचनाचाबलीपुत्र ॥ तोमाझापिताबलावानथोर ॥ जोविष्णुभक्तपरमपवित्र ॥ जितक्रोधजितप्राण ॥११॥
तोसर्वदैत्यजनेश्वर ॥ तुम्हांदेवासीजिंकोनीसत्वर ॥ त्र्यैलोक्याचेंराज्यसमग्र ॥ करिताझालापराक्रमें ॥१२॥
मगत्वामहाविष्णुप्रार्थिला ॥ मगतोआदितीपोटींजन्मला ॥ वामनखुजटरुपभला ॥ वंचिताझालापित्यासमाझ्या ॥१३॥
त्रिपदभुमीचीयाचनाकेली ॥ सद्भावेंदेताझाबळी ॥ वामनेंतझालाबळी ॥ वामनेंतनुवाढविली ॥ वंचिताझालापित्यासमाझ्या ॥१४॥
जेव्हांतोअच्युतहरी ॥ बळीसीघालीतपाताळविवरीं ॥ तेव्हांपासोनितुंइंद्रानिधींरीं ॥ उपभोगघेसीत्रिलोकाचा ॥१५॥
यासीदेवसझालेबहुत ॥ आतादैत्याचाकाळझालाप्राप्त ॥ जितकाकाळत्वाभोगिलानिश्चित ॥ तितकाकाळाम्हीभोगुं ॥१६॥
मीतरीबळीचासुत ॥ त्र्यैलोक्यराज्यकरीन निभ्रात ॥ दुतबोलोइंद्रप्रत ॥ धारासुराचाप्रताप ॥१७॥
तेणेंआराधिलाचतुरानन ॥ अजिंक्यलोकांसझालाजाण ॥ आणिकएक ऐकाकारण ॥ दुतम्हणतसेइंद्रासी ॥१८॥
अदितीदितीदोघीयुवती ॥ कश्यपाच्याभार्याअसती ॥ अदितीपासोनजन्मनिश्चिती ॥ तुझाअसेदेवोत्तमा ॥१९॥
दितीपासोनीआमुचाजन्म ॥ तरीदायादपणाअसेसम ॥ श्रुतिस्मृतियुक्तहानियम ॥ विभागभोक्ते आम्हीदैत्य ॥२०॥
आतांदेइराज्याअम्हासी ॥ सामयौपायेंसांगतोतुजसी ॥ रामौपायेंशुभफलासी ॥ परस्परेंसिद्धहोती ॥२१॥
साम उपायआहेश्रेष्ठ ॥ सामोपायेंकार्यकरितावरिष्ठ ॥ सौजन्यपरस्पर उत्कृष्ट ॥ सामोपायेंराहतसे ॥२२॥
बुद्धिवंतजेसुजाण ॥ त्यांनीसामउपायसोडुन ॥ कलहविग्रहनिष्कर्षजाण ॥ कदापिहीनकरावा ॥२३॥
सामउफायेकार्यन होय ॥ तेंथेंद्कानरुउपाय ॥ तेथेंदानरूपउपाय ॥ दानदेतांहीनघडेकार्य ॥ तरीभेद उपायतोतिसरा ॥२४॥
प्रधानमंत्रीआदिकरुन ॥ देह्साधिग्रामाधिपजन ॥ त्यांसीकाम्हींद्रव्यदेऊन ॥ आपुलेंसेंकरावें ॥२५॥
त्याद्वारानेंसैनिकसर्व ॥ प्रयत्‍नमोडावाएकविधभाव ॥ तेणेंहीकार्यनहोयसंभव ॥ तरीमगौपायदंडवथा ॥२६॥
विग्रहम्हणजेसमरंगण ॥ करोनीजिंकावेंशत्रुसीजाण ॥ त्याचेंऐश्वर्यकरावेंहरण ॥ पराक्रमकरोनियां ॥२७॥
युद्धीतुम्हासीकैचेंबळ ॥ अशक्तदेवतुम्हीसकळ ॥ आम्हीदानवदैत्यप्रबळ ॥ महाबलाढ्यप्रतापी ॥२८॥
यास्तवसामोपायेंसौजन्य ॥ देऊनीराज्यकरीअर्पण ॥ व्यर्थसकळदेवसैन्य ॥ मारूनकोदेवेंद्रा ॥२९॥
दुतम्हणेइंद्रासी ॥ माझेंवचनतुंनमानिसी ॥ तरीदैत्यंद्रधारासुरतुजसी ॥ जिंकुनीराज्यघेईल ॥३०॥
पूर्वीचेजेदैत्यथोर ॥ ज्यांचाकेलात्वांअपकार ॥ त्यांचेउसनेंफेडीलसत्वर ॥ बलीपुत्रप्रतापी ॥३१॥
स्कंदम्हणेदैत्यदुत ॥ इंद्रासीबोलुनिराहिलानिवांत ॥ मगतोइंद्रविस्मययुक्त ॥ हाम्सुनीसभेंतबोलतसे ॥३२॥
इंद्रम्हणेदैत्यदुतासी ॥ अरेतुंबहुधीटपणेंबोलसी ॥ आपुलेंचातुर्यदाखविसी ॥ वक्तेपणाचेंसभेंत ॥३३॥
जायतुंआतांदैत्यवर्यासी ॥ माझींवचनेंसांगेत्यासी ॥ निःसंशयतूदायादाअहेसी ॥ देवराजाचाविभागी ॥३४॥
जरीएकपित्यापासोन ॥ मातृभेदेंपुत्रझालेंउत्पन्न ॥ उत्तमाधममध्यमजाण ॥ समाननसतीतेसर्व ॥३५॥
जरीएकबीजसंभव ॥ समानमानावेतेंसर्व ॥ तरीश्रुतिस्मृतीसींविरोधभाव ॥ परस्परेंहोईल ॥३६॥
जेष्ठांशप्राप्तजेष्ठासी ॥ त्याहुनाअर्धमध्यमपुत्रासी ॥ त्याहुन अर्धकनिष्ठासी ॥ व्यवस्थाधनाचीहोतसे ॥३७॥
पित्रार्जितवित्ताचा ॥ विभागहोतसेसाचा ॥ अनलोमविलोमपुत्राचा ॥ विभागसंबधनसेची ॥३८॥
स्वसंपादितद्रव्याचा ॥ पिताभागदेईलसाचा ॥ तोतरीचरद्रव्याचा ॥ स्थावरविभागहोतनाही ॥३९॥
स्थावराचाज्येष्ठाधिकारी ॥ इतरांसीनमिलेनिधारीं ॥ पित्रार्जितधनाचीखरी ॥ विभागव्यवस्थाहोतसे ॥४०॥
ज्याचेंत्यानिमेळविलें ॥ त्यांतदुसर्‍याचासंबंधनचाले ॥ स्वर्गाचेंराज्यभलें ॥\ कश्यपेंसेपादिलेंनाहींच ॥४१॥
किंवामरीचीनेमेळविलें ॥ ऐसेंतोकंहीचनाहींघडलें ॥ जरीकश्यपेंअसतेंपादिलें ॥ तरीदैत्यासीविभाग मिळावा ॥४२॥
कश्यपासीस्त्रियाबहुत ॥ त्यासीसंततीहीअसंख्यात ॥ सर्वासीहिविभागप्राप्त ॥ तेव्हातुम्हांसीहोईल ॥४३॥
तस्मातराज्यहेंस्वर्गाचें ॥ म्यांपराक्रमेंमिळविलेंसाचें ॥ पिताकींवापिता महाचें ॥ संपादितनव्हेकीं ॥४४॥
येथेंविभागदैत्यासी ॥ मिळेलकैसाबेगेंसी ॥ इंद्रम्हणेदैत्यदुतासी ॥ ईश्वरमर्यादातेहीऐक ॥४५॥
स्वर्गीराहावेंदेवांनीं ॥ भुतळींअसावेंमानवांनीं ॥ पाताळीवासदानवांनीं ॥ दितीपुत्रांनीकरावा ॥४६॥
असुरांचेंकेवळशरीरबळ ॥ शास्त्रनमानितीरबळ ॥ तैसेंआम्हीनोव्हेतसकळ ॥ शास्त्रबळथोराअमुचें ॥४७॥
शास्त्रबळशरीरबळ ॥ द्विगुणत आमुचेंबळ ॥ दैत्यगर्वकरीलतोकाळ ॥ जवंजज्रमाझेंपाहिलेंनाहीं ॥४८॥
तोकाळबोलेलपौरुषयुक्त ॥ तोकाळराज्याशाधरीलमनांत ॥ तोकाळदायादसंबंधदर्शित ॥ करुनीबोलेलदैत्यती ॥४९॥
दैत्यशोणितोंस्त्रिग्धझालें ॥ ऐसेंवज्रनाहींपाहिलें ॥ दैत्यमनीथरारले ॥ वज्रासीपाहतां ॥५०॥
जायदूतातूसत्वरीं ॥ माझेंवचनत्यानिवदेनकरीं ॥ वार्ताकळवावीसाचारी ॥ हेंचकर्तव्यदूताचें ॥५१॥
म्हणेपांडुरंगजनार्दन ॥ दूतवार्तासांगेलजाऊन ॥ पुढेंहोईलसमरगण ॥ देवदैत्यांचेअत्यंत ॥५२॥
इतिश्रास्कंदपुराणे ॥ सह्याद्रीखंडे ॥ तुरजामहात्म्ये ॥ शंकरवरिष्ठसंवादे दुतगमनेनाम ॥ अष्टविंशोध्यायः ॥२८॥
श्रीजगंदबार्पणस्तु ॥ शुभंभवतु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments