Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री रेणुका मातेचा जोगवा

Renuka Mata  Navratra | श्री रेणुका मातेचा जोगवा
वेबदुनिया
माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास ।
भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥

पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार
अंगी चोळी ती हिरवीगार ।
पितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥

बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे ।
काफ बाल्याने कान ही साजे ।
इच्या नथेला ग इच्या नथेला ग हिरवे घोस ॥ भक्त येती ॥

सरीठुसीत गं सरीठुसीत मोहनमाळ ।
जोडवे मासोळ्या पैंजन चाळ ।
पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस ॥ भक्त येती ॥

जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले ।
तुरे हार माळीने गुंफीयेले ।
गळा शोभे तो गं रुप शोभे तो गं । आनंदास ॥ भक्त येती ॥

हिला बसायला गं हिला बसायला चांदीचा पाट ।
हिला जेवायला चांदीचे ताट ।
पुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक्त येती ॥

मुखी तांबुल पाचशे पानांचा ।
मुखकमली रंग लालीचा ।
खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥

विष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला ।
माझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी
व्हावे अखंड अखंडीत पावनी
सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥
सर्व पहा

नवीन

श्री म्हाळसा देवीची आरती

Holashtak 2025: होलाष्टक २०२५ कधी सुरू होईल? होलाष्टकचे महत्त्व, नियम आणि खबरदारी, संपूर्ण माहिती जाणून घ्या

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

भारतातील या मंदिरांमध्ये माकडांची पूजा केली जाते

Guruvar Upay for Marriage गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

Show comments