Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भवान्यष्टकं अर्थासहित

Webdunia
न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥1॥
भावार्थ :- हे भवानी ! पिता, आई, भाऊ, दाता, पुत्र, कन्या, सेवक, स्वामी, पत्नी, ज्ञान आणि वृत्ती, यापैकी कोणीही माझे नाही, हे देवी! फक्त तूच माझी परम गति आहेस.
 
भवाब्धावपारे महादुःखभीरुः पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥2॥
भावार्थ :-  हे भवानी! मी अथांग भवसागरात अडकलो आहे आणि मी भवदु:खाने ग्रस्त आहे . काम लोभादि विकाराने या संसार बंधनात बंदिस्त झालो आहे. आता फक्त तूच माझी गती आहेस. तूच माझी परम गती आहेस.
 
न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम्।
न जानामि पूजां न च न्यासयोगम् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥3॥
भावार्थ :- हे भवानी! न मी दान करणे जाणतो,न ध्यानयोग  मला अवगत आहे, न मला तंत्र,मंत्र, स्तोत्रादी चे ज्ञान आहे, पूजा आणि न्यास या क्रियाहि मला माहित नाहीत . तेव्हा हे भवानी तूच माझी गती आहेस, आणि तूच माझी परम गती आहेस.
 
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥4॥
भावार्थ:- न मी पुण्य जाणतो न मी तीर्थ.न मी मुक्ती जाणतो न लय. हे आई! भक्ती आणि व्रतवैकल्ये याचे हि मला ज्ञान नाही. तेव्हा हे भवानी आता तूच माझी गती आहेस. तूच परम गती आहेस.
 
कुकर्मी कुसंगी कुबुद्धिः कुदासः कुलाचारहीनः कदाचारलीनः।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहम् गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥5॥
 भावार्थ:- मी कुकर्मी, कुसंगतीत राहणारा,दुर्बुद्धि,दुष्टदास,कुलाचारहिन सदाचारहीन,दुराचारपरायण, कुत्सित दृष्टि ठेवणारा आणि सदा दुर्वचन बोलणारा आहे ,हे भवानि! माझी तूच  एकमात्र उत्तम गति आहेस.
 
प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित्।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥6॥
भावार्थ:- मी ब्रह्मा, विष्णु ,शिव,इंद्र, सूर्य, चंद्र वा अन्य कोणत्याही देवतांना जानत नाही . हे भक्तांना शरण देणारी भवानी ! तूच एकमात्र माझी परम गती आहेस. 
 
विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये। 
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥7
भावार्थ:- हे आई ! तू विवाद, विषाद ,प्रमाद, विदेश, जल, अनल, पर्वत,वन आणि शत्रू मध्ये सदा माझे रक्षण कर ,हे भवानी ! तू एकमात्र माझी   परम गति आहेस.
 
अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।
विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥8
भावार्थ:- हे भवानी! मी सदा अनाथ, दरिद्री, जरा-जीर्ण ,रोगी अत्यन्त दिन-दुबाळा, मुक, विपत्त्ती ने ग्रस्त आहे, नष्ट आहे , आता एकमात्र माझी गति आहेस.
 
इति श्रीमच्छंकराचार्यकृतं भवान्यष्टकं सम्पूर्णम्।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments