Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Durga Saptashati दुर्गा सप्तशती शापित का ?

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (11:47 IST)
शास्त्रांप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठ करणे खूप शुभ मानले जाते. दुर्गा सप्तशती पाठ केल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होता आणि घरात सुख-समृद्धी येते. तसेच नवरात्री दरम्यान दुर्गा सप्तशती पाठ करणे अधिकच शुभ मानले जाते परंतु आपल्याला हे माहित आहे का की हा पाठ श्रापित है. 
 
दुर्गा सप्तशतीचा शाप कोणी आणि का दिला?
दुर्गा सप्तशती ही माँ दुर्गेच्या मंत्रांनी बनलेली आहे. एका पौराणिक कथेनुसार, जेव्हा दुर्गा मातेने काली मातेचे रूप धारण करून वाईट शक्तींशी लढा दिला तेव्हा राक्षसांचा पराभव झाला पण देवीचा राग शांत झाला नाही.
 
आईचा राग जसजसा वाढत होता, तसतशी आईच्या अंगातून बाहेर पडणारी ऊर्जा दैवी मंत्रांचे रूप धारण करत होती. या मंत्रांचा जन्म माता कालीच्या शरीरातून झाला असल्याने या मंत्रांना तांत्रिक मंत्र म्हटले गेले जे पृथ्वीसाठी अत्यंत विनाशकारी होते.
 
ALSO READ: या 7 श्लोकात दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण पाठाचे सार दडलेले
 
माता कालीला शांत करण्यासाठी, भगवान शिवाने स्वतः उग्र रूप धारण केले आणि तिला शांत केले आणि तिला पार्वतीच्या रूपात आणले. जेव्हा माता पार्वती तिच्या शांत रूपात आली तेव्हा तिच्या शरीरातून सात्विक मंत्रांच्या रूपाने सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत होती.
 
त्यानंतर भगवान शिवाने माता दुर्गेच्या शरीरातून निघणारे सात्विक आणि तांत्रिक मंत्र आपल्या रुद्राक्षांमध्ये ग्रहण केले आणि त्या रुद्राक्षाच्या बिया मार्कंडेय ऋषींना दिल्या. मार्कंडेय ऋषींनी त्या मंत्रांपासून दुर्गा सप्तशती निर्माण केली.
 
मार्कंडेय ऋषींनी जेव्हा दुर्गा सप्तशती ब्रह्माजींना सांगितली तेव्हा ब्रह्माजींनी भगवान शिवांना दुर्गा सप्तशतीच्या तांत्रिक मंत्रांना शाप देण्याची विनंती केली जेणेकरून कोणीही त्यांचे जप करून चुकीची तांत्रिक साधना करू नये.
 
याच कारणामुळे दुर्गा सप्तशती शापित मानली जाते. तथापि संपूर्ण दुर्गा सप्तशती शापित नाही तरी त्यात लिहिलेले केवळ तांत्रिक मंत्रच शापित आहेत आणि शापित असल्यामुळे त्या मंत्रांचे पठण केल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही.

ALSO READ: श्री दुर्गा सप्तशती पाठ संपूर्ण
 
दुर्गा शाप विमोचन मंत्र
सोऽहमर्कमयं ज्योतिरर्कज्योतिरहं शिवः । आत्मज्योतिरहं शुक्रः सर्वज्योतीरसोऽस्म्यहम् ॥ ॐ देवि ! गायत्रि ! त्वं शुक्रशापाद्विमुक्ता भव.
ॐ अहो देवि महादेवि संध्ये विद्ये सरस्वति ! अजरे अमरे चैव ब्रह्मयोनिर्नमोऽस्तु ते ॥ ॐ देवि गायत्रि त्वं ब्रह्मशापाद्विमुक्ता भव, वसिष्ठशापाद्विमुक्ता.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सिद्धीदात्री देवी मंदिर सागर

Navratri 2024 दुर्गा देवीचे नववे रूप सिद्धीदात्री

Kanya Pujan 2024 कन्या पूजन कसे करावे, नियम जाणून घ्या

महागौरी देवी मंदिर लुधियाना

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments