rashifal-2026

नोकियाचा सर्वात स्वस्त फोन

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (13:50 IST)
HMD Global ने आपला नवीन फोन Nokia C12 भारतात लॉन्च केला आहे. Nokia C12 हा एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे आणि नोकियाच्या C सीरीजचा नवीन सदस्य आहे. Nokia C12 सह व्हर्च्युअल रॅम पण देण्यात आली आहे. ज्यांना चांगला लुक हवा आहे आणि कमी किमतीत Android फोन स्टॉक करायचा आहे त्यांच्यासाठी Nokia C12 सादर करण्यात आला आहे. Nokia C12 मध्ये सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Nokia C12 मध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Nokia C12 च्या कॅमेरासोबत पोर्ट्रेट आणि विशेषत: नाईट मोड देण्यात आला आहे.
 
Nokia C12 मध्ये 6.3-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या Nokia फोनमध्ये AndroidTM 12 (Go Edition) आहे, जो 20 टक्के अधिक मोफत स्टोरेजचा दावा करतो. यासोबतच 2 GB व्हर्चुअल रॅम देखील उपलब्ध आहे.नोकियाच्या या फोनमध्ये Unisoc 9863A1 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.
 
कनेक्टिव्हिटीसाठी, या Nokia फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रो USB, WiFi: 802.11 b/g/n, वायरलेस रेडिओ आणि वायर रेडिओ दोन्ही आहेत. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी आहे जी फोन मधून काढता येते.
 
Nokia C12 चा सेल भारतात सुरु झाला आहे. Nokia C12 च्या 2 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा फोन डार्क शिऑन आणि लाइट मिंट कलरमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत हा फोन 17 मार्चपर्यंतच खरेदी करता येईल, म्हणजेच ही लॉन्चिंग किंमत आहे.
Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

अजित पवारांचा विमान अपघात: तपासासाठी कुटुंब एकत्र आलं, आता सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवला

खुनीने पत्नीचा गळा चिरला, पती असहाय्य साक्षीदार बनला! बेंगळुरूमधील भयानक घटना

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणी वाढल्या, इम्रान खान यांना पत्र लिहिल्याबद्दल एफआयआर दाखल

टिपू सुलतान चौक आता 'अशफाकुल्ला खान' म्हणून ओळखला जाईल; मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपचा प्रस्ताव मंजूर

LIVE: टिपू सुलतान चौक आता 'अशफाकुल्ला खान' म्हणून ओळखला जाईल

पुढील लेख
Show comments