rashifal-2026

जिओला ‘६’ सीरिजचे नवे नंबर देण्याची परवानगी

Webdunia
दूरसंचार विभागाकडून रिलायन्स जिओला नव्या सीरिजचे नंबर देण्याची परवानगी मिळाली असून हा नंबर ‘६’ सीरिजचा असल्याची माहिती आहे. ६ सीरिजचा एमएससी (मोबाईल स्विचिंग कोड) जारी करण्यासाठी रिलायन्स जिओला दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिओच्या काही ठराविक सर्कलमध्येच ६ सीरिजचे नंबर वितरीत केले जातील. जिओ सध्या मिळालेल्या परवानगीनुसार एमएससी नंबर आसाम, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये वितरीत करणार आहे. राज्यस्थानमध्ये ६००१०-६००१९, आसाममध्ये ६००३०-६००३९ आणि तामिळनाडूमध्ये ६००४०-६००४९ असा एमएससी कोड असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.या सीरिजचे नंबर जिओने दिले तर ६ सीरिजचे नंबर देणारी ही पहिलीच दूरसंचार कंपनी असेल. आतापर्यंत ९, ८ आणि ७ या सीरिजचे नंबर जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने या सीरिजला परवानगी देण्यामागे जिओचे वाढते युझर्स हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भंडारा : मालमत्तेच्या वादातून जावयाने सासऱ्याची हत्या केली

LIVE: ठाकरे गटाचे दगडू सकपाल यांचा शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश

फडणवीस काय बोलले इंटरव्ह्यू मध्ये

शाळांना सलग 5 दिवस सुट्टी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments