Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

Webdunia
मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण भविष्यात हे काम रोज्याचा रोज करण्याची गरज उरणार नाही. कारण, यापुढे एकदा चार्ज केलेला मोबाइल तब्बल तीन महिने चार्ज करण्‍याची गरज लागणार नाही.
चकित झालात ना? पण हे खरे आहे. सध्याच्या शंभरपट कमी ऊर्जेचा वापर करणार्‍या मोबाइल प्रोसेसरचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. मिशिगन आणि कॉर्नेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा शोध लावला आहे. मॅग्नेटोइलेक्ट्रि मल्टीफेरिक असे या उपकरणाचे नाव आहे. हे उपकरण चुंबकीय ध्रुवीय फिल्म तयार करणार्‍या अणूंचा थर पातळ करते. याच सिद्धांताचा वापर करून बायनरी कोड 1 आणि 0 कडे पाठविण्यासाठी करण्यात येतो, ज्यावर आपल्या संगणकाचे काम चालते.
 
मोबाइलमधील सध्याचे प्रोसेसर सेमीकंडक्टर प्रणालीचा वापर करून बनवले जातात. या प्रोसेसरना सतत वीजपुरवठ्याची गरज असते. याउलट, मॅग्नेटोइलेक्ट्रिक मल्टीफेरिक्स यंत्रणेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रोसेसरला विजेच्या कमीत कमी दाबाची आवश्यकता असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हा प्रोसेसर विजेचा केवळ एक छोट्यात छोटा भाग वापरून डेटा मिळवू शकतो किंवा पाठवू शकतो.
 
जगभरातील सध्या ऊर्जा वापरापैकी पाच टक्के ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात वापरली जाते. 2030 पर्यंत हेच प्रमाण 40 ते 50 टक्के इतके होणार आहे. त्यामुळे हे नवे तंत्रज्ञान ऊर्जा वापराच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असे मत लॉरेन्स वर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेतील सहायक संचालक राममूर्ती रमेश यांनी व्यक्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

LIVE: छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

नितीन गडकरींचा नागपूर विमानतळाबाबत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

Shooting: भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन करेल

पुढील लेख
Show comments