Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nokia 9 PureView: 6 कॅमेर्‍यांसह स्मार्टफोन, वैशिष्ट्ये लीक !

Webdunia
मागील वर्षी 2018 मध्ये मोबाइल कंपन्यांद्वारे एकाहून एक फीचर्स असलेले मोबाइल फोन लाँच करण्यात आले आणि त्यांना ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद देखील मिळाला. पण आता 2019 स्मार्टफोन्स तंत्रज्ञानासाठी अजूनच धुमाकूळ करणारा ठरणार आहे.
 
अशीच चर्चा नोकिया 9 प्योअरव्यूह बद्दल सुरू आहे. हा फोन प्रत्येकाच लक्ष आपल्याकडे ओढणार आहे. नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन्स बनवणार्‍या कंपनीचा हा सर्वात उत्तम फोन असणार आहे. या कंपनीने आधीही नोकियासाठी स्मार्टफोन्स बाजारात लाँच केले आहेत.
 
सूत्रांप्रमाणे 2019 च्या सुरुवातीला Nokia 9 PureView लाँच होऊ शकतो. हा स्मार्टफोन लाँच होण्याचा आधीच याचे काही फोटो आणि वैशिष्ट्ये लीक झाले असून या फ्लॅगशिपफोनचे सर्वात खास फीचर आहे कॅमेरा.
 
या फोनमध्ये एकूण 6 कॅमेरे असू शकतात. काही दिवसांपूर्वीच नोकिया 9 प्योअरव्यूहचे काही चित्र लीक झाले होते. यात डिव्हाईसचा पेंटालेस कॅमेरा सेटअप समोर आला होता. या फोनच्याबँकवर 5 कॅमेरे आणि फ्रंटमध्ये सेल्फीसाठी एक कॅमेरा असण्याची माहिती मिळत आहे.
 
5 कॅमेरेपैकी दोन कॅमेरे 12 मेगापिक्सलचे, दोन कॅमेरे 16 मेगापिक्सलचे आणि 5 वा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असू शकतो. याच्यात 4 लेन्स, एलईडी फ्लॅशसोबत असेम्बल असेल आणि पाचवा लेन्स मिडिलमध्ये असेल. स्मार्टफोनचा फ्रंट 12 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल.
 
रिअर पॅनेलमध्ये नोकियाच लोगो दिलं जाईल. असे कळण्यात आले आहे की या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6 इंचाचा असू शकतो. कंपनी या फोनला 8 जी.बी. रॅमसोबत बाजारात लंच करू शकते. फोनमध्ये 258 जी.बीचा विशाल स्टोरेज होण्याची संभावना आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देखील असू शकतो.
 
नोकियाच्या या डिव्हाईसमध्ये नॉच-लेस ओएलइड स्क्रीनच्या सोबत इन-स्क्रीन फिंगरप्रिंट पण असू शकतो. लीक झालेल्या माहितीच्या अनुसार फोनमध्ये 4150 एम.ए.एचची मोठी बॅटरीच्या सोबत फास्ट चार्जिंग पण असू शकते. यामध्ये 3.5 एम.एमचा ऑडियो जॅक पण असेल.
 
सूत्रांप्रमाणे एच.एम.डी ग्लोबल नेक्स्ट जेनरेशनचा स्नॅपड्रॅगन 855 एस.ओ.सी. प्रोसेसरचा पण उपयोग करण्यात येणार आहे. किंमतींबद्दल सांगायचे तर नोकिया 9 प्योअरव्यूहची किंमत 50,000 ते 60,000 पर्यंत असण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments