Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Samsung चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या डिटेल्स

samsung galaxy m01
Webdunia
सोमवार, 27 जुलै 2020 (17:22 IST)
दक्षिण कोरियाची आघाडीची मोबाइल कंपनी  सॅमसंगने भारतात आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy M01 Core लाँच केला आहे. सॅमसंगचा हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरला आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने गेल्या आठवड्यात इंडोनेशियामध्ये लाँच केला होता. Samsung Galaxy M01 Core या नवीन फोनमध्ये ‘अँड्रॉइड गो’ ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.
 
Samsung Galaxy M01 Core: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स :-
‘सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोर’ हा नवीन फोन ‘अँड्रॉइड गो’वर कार्यरत असून डार्क मोड इंटिग्रेशन आणि इंटेलिजेंट इनपुट्स व इंटेलिजेंट फोटोज यांसारखे फीचर्स आहेत. 5.3 इंचाचा एचडी+ TFT डिस्प्ले आणि क्वॉड-कोर मीडियाटेक 6739 प्रोसेसर असून स्टोरेजसाठी 32 जीबीपर्यंत स्पेस आहे.
 
याशिवाय इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवताही येणं शक्य आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा आहे. तर पुढील बाजूला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-युएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन यांसारखे पर्याय आहेत. 3000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असून याद्वारे 11 तासांचा टॉक टाइम बॅकअप मिळतो असा कंपनीचा दावा आहे.
 
किंमत :- Samsung Galaxy M01 Core
सॅमसंग गॅलेक्सी एम01 कोरच्या 1 जीबी रॅम व 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 5,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 2 जीबी रॅम व 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 6,499 रुपये आहे. ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा तीन कलरच्या पर्यायांमध्ये हा फोन खरेदी करता येईल. हा फोन सॅमसंगच्या रिटेल स्टोअर्सशिवाय सॅमसंग इंडिया ई-स्टोअर आणि प्रमुख ऑनलाइन स्टोअर्समधून खरेदी करता येईल. 29 जुलैपासून हा फोन खरेदी करता येईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात 48 तासांत गारपिटीचा हाय अलर्ट

राज्यात 48 तासांत गारपिटीचा हाय अलर्ट

लाहोर विमानतळावर पाकिस्तानी लष्कराच्या विमानाला आग

पाकिस्तानने LoC वर परत सुरू केला गोळीबार

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर मोठा अपघात सहा स्वच्छता कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments