Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चूक दुरूस्त करण्याची संधी देणार आयफोन स्टिग अँप

Webdunia
बुधवार, 7 जानेवारी 2015 (15:49 IST)
मित्रमैत्रिणींना मेसेज पाठविणे, फोटो पाठविणे, व्हिडिओ पाठविणे हा आजकाल रोजच्या उद्योगातला एक अविभाज्य भाग झाला असला तरी अनेकवेळा आपण हा मेसेज, फोटो, व्हिडिओ पाठवायला नको होता, थोडी चूकच झाली अशी भावनाही अनेक जणांच्या मनात येत असते. ही चूक सुधारण्याची आणि आपले खासगीपण कायम राखण्याची संधी आयओएस आयफोन मोबाइल अँपमुळे उपलब्ध झाली आहे.स्टिंग नावाचे हे अँप ही संधी तुम्हाला देऊ शकते.
 
या अँपमुळे तुम्ही कुणालाही मेसेज, फोटो, आपला डेटा अथवा व्हिडिओ पाठविला आणि तो संबंधिताच्या फोनवरून तुम्हाला काढून टाकायचा असेल तर त्याला हे अँप मदत करते. याचाच अर्थ तुम्ही शेअर करत असलेल्या डेटावर तुमचा कंट्रोल राहतो. स्नॅपचॅट, क्लस्टर यांच्याप्रमाणेच हे अँप आहे. मात्र स्नॅपचॅटवर आपण पाठविलेला मेसेज दुसर्‍याने शेअर केला की गायब होतो तर क्लस्टरवर फोनवरूनच फोटो डाऊनलोड करता येतात. मात्र स्टिंग अँपमध्ये तुम्ही फोटो, मेल कांहीही पाठविले असेल तरी जोपर्यंत तुमची परवानगी नाही तोपर्यंत फोटो वा तत्सम डेटा सेव्ह करता येत नाही.
 
एखाद्याने जादा हुशारी दाखवून हा डेटा स्क्रीन शॉर्ट करून सेव्ह करण्याचा प्रयत्न केलाच आणि असा प्रयत्न तीन वेळा केला गेला तर स्टिंग अँप संबंधिताचे अकौंटच बंद करून टाकते. विशेष म्हणजे युजरने पाठविलेला मजकूर डिलीट केला की तो स्टिंग सर्व्हरमधूनही डिलीट होतो यामुळे आपले खासगीपणे जपणे शक्य होते. हे अँप मोफत डाऊनलोड करता येते मात्र त्यासाठी सध्या एक अट आहे ती म्हणजे तुम्ही आणि ज्याला डेटा पाठविता त्याच्याकडेही आयफोनच असला पाहिजे. लवकरच हे अँप विंडोज आणि अँड्रॉईडवरही उपलब्ध होणार आहे असेही समजते.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments