Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल घेत असाल तर खुशखबर

Webdunia
मंगळवार, 23 जून 2015 (14:08 IST)
मोबाइल घ्यायच्या विचारात असाल तर सॅमसंगनं तुमच्यासाठी खूप चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. स्वस्त स्मार्टफोन बाजारातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन श्याओमी, मायक्रोमॅक्स, वनप्लस वनला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने आपल्या गॅलॅक्सी ग्रँड मॅक्सवर 20 टक्क्यांची  भरभरून सूट दिलीय.
 
फेब्रुवारीमध्ये सॅमसंगनं हा मोबाइल 15,990 रूपयांना बाजारात आणला होता. नुकतीच कंपनीनं या मोबाइलची किंमत कमी करून 12,990 केली होती. वाढती स्पर्धा लक्षात घेत कंपनीनं पुन्हा किंमत कमी केलीय. त्यामुळे आता हा मोबाइल 11,990 ला बाजारात उपलब्ध झालाय. 
 
एवढंच नाही तर कंपनीनं या मोबाइलच्या खरेदीवर 11,000 रूपयांच्या ऑफर्सही देऊ केल्यात. या ऑफर्स स्नॅपडील, फूडपांडा आणि यात्रा कंपनीच्या गिफ्ट कूपन स्वरूपात असतील.
 
या मोबाइलमध्ये 5.25 इंच एचडी डिस्प्ले दिला गेलाय. तसंच 1.2 ऋकू क्वाड-कोअर क्वालकॉम स्नपड्रगन 410 प्रोसेसर सोबत 1.5 जीबी रॅमही दिली आहे. 
 
सॅमसंग गॅलॅक्सी ग्रँडमध्ये 16 जीबी इंटर्नल मेमरी असून 64 जीबीपर्यंत वाढवता येईल. यासोबत 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा फ्लॅशसह दिला गेलाय जो कमी प्रकाशातही चांगले फोटो देतो. 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेलाय. कनेक्टिविटीमध्ये यात 3जी, LTE, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी, जीपीएस, ब्लूटूथ 4.0 दिलं गेलय. यात रिमुव्हेबल बॅटरी पण असून याचं वजन 161 ग्रॅम आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments