Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्कर मिळवायचाय? गरीबी दाखवा !

वेबदुनिया
IFMIFM
ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल दिग्दर्शित 'स्लमडॉग मिलिनयर' या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. पण ऑस्कर मिळाल्यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे 'भारताची गरीबी परदेशात विकण्याची'. भारतातील गरीबीचे चित्रण करणार्‍या सिनेमांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक मिळते असे आतापर्यंतचे मत होते. पण त्याचबरोबरीने ही गरीबी भारतीय दिग्दर्शकाने दाखवली तर तला कौतुकाखेरीज पुरस्कार वगैरे मिळत नव्हते. कारण इतिहास तेच सांगतो.

मदर इंडिया, सलाम बॉम्बे हे चित्रपट भारतीय गरीबीवरच आधारले आहेत. लगान क्रिकेटवर आधारीत असला तरी त्याच्या मुळाशी गरीबीच होती. पण त्यांना ऑस्कर मिळाले नाही. इतकेच काय पण दीपा मेहता यांनी कॅनडातर्फे 'वॉटर' हा वृंदावनमधील विधवांचे दुःखद चित्रण असलेला चित्रपट ऑस्करसाठी पाठवला होता. पण ऑस्करमध्ये तोही डावलला गेला. इतके च का य प ण सत्यजि त रा य य ा प्रतिभावं त दिग्दर्शकान े गरीबीच े अत्यं त वेध क चित्र ण करूनह ी त्यांन ा चित्रपटांसाठ ी कधी च ऑस्क र मिळाल ा नाह ी. मिळाल ा त ो लाईफटाई म अचिव्हमें ट य ा स्वरूपा त. म्हणज े लाईफटाई म अचिव्हमें ट ज्य ा चित्रपटांसाठ ी वाटत े, त े ऑस्करलाय क नाही त का य?

पण आता स्लमडॉगला मात्र ऑस्कर मिळाले आहे. मग स्लमडॉगच्या तुलनेत मीरा नायरच्या 'सलाम बॉम्बे'मध्ये काय कमी होते. मग त्याला का ऑस्कर मिळाले नाही. ती भारतीय आहे म्हणून? तीच कथा ' स्माईल पिंकी' या शॉर्ट डॉक्युमेंटरीची. ही पिंकी उत्तर प्रदेशातील मिर्झापुरची आहे. ओठ फाटलेल्या पिंकीचा संघर्ष या चित्रपटात वर्णन केला आहे. थोडक्यात गरीबी आणि संघर्ष हे तिच्या आयुष्यातील प्रमुख घटक आहे. या विषयावर अनेक भारतीयांनी डॉक्युमेंटरी काढल्या आहेत. पण मेगन मेलॅन या परकीय बाईने ही डॉक्युमेंटरी केली काय नि तिच्या झोळीत ऑस्कर जाऊन पडला आहे.

थोडक्या ऑस्कर मिळविण्याचा महत्त्वाचा निकष म्हणजे चित्रपटात, दुःख, दैन्य, गरीबी हवीच. पण ती परकीयांनी दाखवलेली. भारतीयांनी नाही. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली नोंदवायला विसरू नक ा.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments