Dharma Sangrah

व्यक्तिमत्त्व विकासाचाकोर्स करताना...

Webdunia
बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (14:40 IST)
कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी कोर्सचे स्वरूप जाणून घेणे फायाचे आहे.
व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जाताना जी प्रशिक्षणकेंद्रे नोकरीची हमी देतील अशाच केंद्रांमध्ये जावे. याचे कारण बरेचदा अशा केंद्रांचे काही कंपन्यांशी करार असतात, ज्याअन्वये या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडल्यावर प्रशिक्षणार्थी कुठेही नोकरी करू शकतो. अशी प्रशिक्षण केंद्रे शोधल्यामुळे त्याचा दुप्पट फायदा प्रशिक्षणार्थींना होतो.

नोकरदार व्यक्तींना काम सांभाळून हा कोर्स करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा वेळी कोर्स करणे आवश्यकच असेल, तर कामाच्या वेळेनंतर तुमच्या आवाक्यात असलेली वेळ निवडावी. कोर्सला जाणे न जमल्यास त्या काळात चुकलेलं प्रशिक्षण भरून काढण्याचीही तयारी हवी.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकास करणे आवश्यकच आहे. त्यासाठी प्रशिक्षण पुरवणार्‍या संस्थांचे कामही कौतुकास्पद आहे. पण या संस्थांमध्येही उपयुक्त संस्था कुठल्या हे निवडूनच त्या कोर्ससाठी प्रवेश घ्यावा. आपण त्या कोर्ससाठी आपला वेळ आणि पैसाही खर्च करणार असतो. तिथे आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा असते. त्यामुळेच ही काळजी घ्यावी.
आपला कोर्स पूर्ण झाल्यावरही केंद्रांच्या प्रतिक्रियासत्रात सहभाग घ्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात काकडीने काळी वर्तुळे दूर करा, कसे वापरायचे जाणून घ्या

कोणत्या बाजूला झोपावे, उजवीकडे की डावीकडे? झोपण्याची योग्य स्थिती जाणून घ्या

पालकांनी सकाळी उठल्याबरोबर मुलांना या गोष्टी शिकवल्या पाहिजेत

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

नाताळ कहाणी : प्रभु येशूचा निस्सीम भक्त सांताक्लॉज

पुढील लेख
Show comments