Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फिलिपाईन्स डायरी 4

- चारू वाक (अनुवादित)

Webdunia
PR
हाय, माझ्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये असलो की टीव्ही हाच माझा मित्र असतो. त्या डब्याची टकळी अखंड चालू असल्यामुळे आपल्या सोबत कुणीतरी आहे असे वाटत राहते. त्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे मूल रहिवासी असलेला 'ऍबओरिजनल' आणि आफ्रिकेमधून मानववंशाची पसरणं इतर खंडांमध्ये कशी कशी झाली का झालीयाचा शोध घेणारा माहितीपट नॅशनल जिओग्राफिकवर दाखव होते. निष्कर्ष असा होता की पृथ्वीवर वेळोवेळी पडलेल्या दुष्काळामुळे मानव अन्नाच्या शोधात पुढे पुढे सरकत राहिला.

माझ्या फिलिपाईन्स प्रवासाची बातमी कळताच सगळ्या सहकाऱ्यांनी तिथे स्वयंपाकी नसल्यामुळे जेवणाचे हाल होत असल्याचा इशारा दिला. नायजेरियात असताना स्वयंपाकीण होती. अगदी दाक्षिणात्य पेपर डोसा, मुळगापुडी चटणी पासून उत्तरेच्या मटरपनीर पर्यंत म्हणावं ते बनवून खाऊ घालायची.

तसा मी स्वयंपाकघरातला एक चांगला सहाय्यक आहे. माझ्या लुडबूड कारणाच्या या विधानाला अश्विनी नक्कीच होकार देईल. (स्वतः:चा) हात न कापता भाज्या चिरणे, ओवा आणि जिऱ्यामधला फरक समजू शकणे या माझ्या सहायकीय कौशल्याच्या कसोट्या समजता येतील. तर आता मला मिश्रणे करण्याची थोड्या वरच्या पातळीची परीक्षा द्यायची होती.

वीस किलो वजनाचा मर्यादेत मी काही किराणा समानपण घेतले होते. अश्विनीने मला एका माणसासाठी (माझ्या आकाराच्या) किती भात घ्यायचा, त्यात पाणी किती घालायचे अशा 'मूलभूत तंत्राबद्दल' सांगितले होते. मनिलामध्ये उतरल्याच्या पहिल्याच दिवसापासून माझे सत्याचे प्रयोग.... हो 'भूक' हे मूलभूत सत्य आहे ' हे मला एव्हाना कळलेच होते...., चालू झाले.

प्रथेप्रमाणे सगळे IWC (Itians Who Cook) शनिवार रविवारीच खरेदी करतात. भारतीय दुकानांचा शोध हे अजून एक काम. एशियन विकास बँक, एशियन मॅनेजमेंट इंस्टिट्यूट आणि इतरही विविध कंपन्यांमध्ये भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. यू. एन. एव्हेन्यू वरती भारतीय किराणा वस्तू विकणारी काही दुकाने आहते असे सहकाऱ्यांनी सांगितले. 'अस्साद' नावाच्या पाकिस्तानी दुकानाचीही माहिती कळली. हे दुकान भारतीयाचं हवे! अशी माझी त्वरित प्रतिक्रिया झाली नायजेरियात बरेच पर्याय असल्यामुळे आम्ही पाकिस्तानी बासमती तांदूळ घेणेसुद्धा टाळायचो. मित्र म्हणाला, तिथे काही भारतीयाची दुकाने आहेत खरी पण दर्जाबाबत काही वेळा (म्हणजे बऱ्याचदा) तडजोड करावी लागते. पैसे तर काय सगळेच दुकानदार कचकावून लावणार. काही पर्याय नसल्यामुळे माझे स्वदेशीचे खूळ बाजूला ठेवून चुपचाप 'अस्साद' मध्ये खरेदीला गेलो.

किंमतींबद्दल फार विचार करायचा नाही. एक डॉलरम्हणजे 48 पेसो. थोडक्यात एक भारतीय रुपया म्हणजे एक पेसो म्हणता येईल. भाजीपाला फळांच्या किमती साधारण आपल्या सारख्याच. जरा पॉश वस्तीत, मॉलमध्ये खरेदीकेलीत तर थोडा चढा भाव. जवळपासच्या एका गल्लीत आम्ही छोटी भाजीमंडी शोधून काढली. आम्हाला भाजी विकताना भाजीवाले खूश असायचे कारण जादा भाव लावता यायचा आता त्यांना उगाच कशाला नावे ठेवायची आपल्याकडच्या भाजीवाल्यांनीपण तेच केले असते.

माझ्या खाद्य प्रयोगांमध्ये पोहे, उपमा, भरली वांगी, श्रावण घेवडा, कारली पासून व्हेज बिर्याणी आणि पावभाजी पर्यंत प्रकार करून झाले... हे सगळे वाचताना अश्विनीच्या चेहऱ्यावर कसे हसू फुटत असेल याचा मला अंदाज आहे. मी भारतात परतल्यावर स्वयंपाकापासून काही दिवस सुट्टी घेण्याची योजना ती नक्की बनवेल.

माझी अवस्था नोकरी करणाऱ्या मुंबईकर स्त्री सारखी आहे. सकाळी लवकर उठायचे. हॉट प्लेटवर चहा उकळत असताना पोळ्यांचे पीठ भिजवायला घ्यायचे भाजी कुठली बनवायची ते ठरवायचे. भाजी कापून फोडणीला टाकायची. तोपर्यंत आटा भिजलेला असतो. दुसऱ्या हॉटप्लेटवर पोळ्या बनवायच्या. डबा भरायचा थोडासा नाश्ता करायचा. नाश्त्याला वेगळा पदार्थ करण्याची ऐश नाही बरं का. थोडीशी पोळी भाजीच पोटात ढकलून ऑफिसला पळायचे.

इंस्टंट भाज्या आणि इन्स्टंट पोळ्यांमुळे आमच्या काही तरुण सहकाऱ्यांची मजा चालते. पूर्वी कदी मी इन्सटंटच्या वाटेला गेलो नव्हतो पण आता मीसुद्धा भाजीचे एखादे पाकीट, एक दोन गोठवलेले पराठे घेऊन ठेवतो. कधी बनवायचा कंटाळा आला तर बरे पडते.

स्वयंपाक करताना, पोळ्या बनवताना संसाराची काही तत्त्वे उलगडत गेली. ही मेल वाचणारे माझे विवाहित मित्र बऱ्यापैकी सहमत होतील.

1. पोळी नीट लाटायची असेल तर पीठ पुरेसे घट्ट हवे. एकूण काय चिकटपणा आवश्यक.
2. ती (म्हणजे हॉट प्लेट... बरं का) फार गरम असून चालत नाही आणि थंड असली तर उपयोग नाही.
3. कुठेही जास्त जोर देऊन चालत नाही.... (मी पोळी बनवताना देण्याच्या योग्य दाबाबद्दल बोलतोय)... नाही तर फाटते.
4. पाककृती आणि संसाराची भट्टी परिपूर्ण करण्याचा कुठलाही फॉर्म्युला नाही. तो एक प्रयोग करत राहण्याचाच विषय आहे.
5. उत्कटता, योग्य अंदाज आणि सृजनशीतलेमधूनच अविस्मरणीय पदार्थ, प्रसंग घडतात.

याभुकेमुळेच मला माझा भारतीय पुरुषी अहंकार सोडून स्वयंपाक करावा लागला. या भुकेनेच माझ्या मनाला 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' असे समजावल्यामुळे माझ्या हौशी पाककृतीही गळ्याखाली उतरल्या. हीच ती भूक जिने मानवजातीला आफ्रिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतचा फेरा घडवला... व्यंकटेशस्तोत्रात अगदी यथार्थ वर्णन आहे, 'अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरावीशी जगदीशा।'.... भूक... एक अंतिम सत्य!

- चारू वाक ( अनुवादित)
charuwaq@gmail.com
सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

सर्व पहा

नवीन

अभिनेता अल्लू अर्जुन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार

New Year 2025 : नवीन वर्ष साजरे करा महाराष्ट्रातील या अद्भुत ठिकाणी

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

Show comments