श्रीसद्गुरुलीलामृत हे श्रीसद्गुरु ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र आहे. कै. गोपाळ विष्णु फडके यांनी लिहिलेले आहे. श्री गोपाळरावांनी इ. स. १९१८ च्या पुण्यतिथीचे दिवशी गोंदवले येथें चरित्र लिहिण्यास प्रारंभ केला आणि "श्रीसद्गुरुलीलामृत" १९२२-२३ साली प्रथम प्रसिद्ध झाले. भक्त या ग्रंथाचे नियमित पारायण करतात.