Dharma Sangrah

2 सख्ख्या भावांची जात वेगवेगळी, एक भाऊ कुणबी दुसरा मराठा

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (16:46 IST)
राज्यात मराठा आरक्षणावरून सध्या सगळीकडेच गदारोळ सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांसोबत अनेकजण आंदोलनात सहभागी आहे. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसीत करण्याची मागणी केली जात असताना मराठा आणि कुणबी हे एकच आहेत यासंदर्भातील अनेक पुरावे शिंदे समितीला मिळाले आहे. मात्र या कुणबीमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे समोर आलंय. 
 
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे या गावात दोन सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. एकाच्या प्रमाणपत्रावर कुणबी तर दुसऱ्या भावाच्या प्रमाणपत्रावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर असे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
 
आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर कुणबी आणि त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद आहे.
 
कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते जाळून देखील टाकले आहे. मात्र आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने पुन्हा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments