Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, पुण्यातील जंबो कोव्हिड सेंटरमधून थेट 33 वर्षीय युवती बेपत्ता, आईचे उपोषण

Webdunia
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (10:09 IST)
पुण्यातील शिवाजीनगरमधील जंबो कोव्हिड सेंटरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 27 दिवसांपासून कोव्हिड सेंटरमधून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीची आई उपोषणाला बसली आहे. नेहमीप्रमाणे  रूग्णालय प्रशासन मात्र हात झटकून मोकळे झाले आहे.
 
“आमची मुलगी 29 ऑगस्ट रोजी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी भरती झाली होती. 30 तारखेला आम्ही काळजीपोटी रूग्णालयात आलो तर 49 नंबर बेडवर उपचार सुरू असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तसंच ती बरी झाल्यानंतर आणि तिचा क्वारन्टाईन पिरीयड संपल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं गेलं. 13सप्टेंबरला आम्ही रूग्णालयात गेलो असतो तिला उद्या डिस्चार्ज देणार आहोत, असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र ती आणखीही आमच्या नजरेस पडलेली नाही”, अशा संतप्त भावना मुलीच्या आईने व्यक्त केल्या.
 
“आमची मुलगी नेमकी आहे कुठे?”, असा आर्त सवाल मुलीचे कुटुंबीय प्रशासनाला वारंवार विचारत आहेत. प्रशासन काही उत्तर देत नसून मुख्यमंत्री साहेब माझी मुलगी आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी मुलीच्या आईने केलीये.

संबंधित माहिती

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

पुढील लेख
Show comments