Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात दुकानदार महिलेला पोलीस कर्मचाऱ्या कडून बेदम मारहाण

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (23:47 IST)
पोलीस जनतेचे रक्षक म्हणून ओळखले जातात. मात्र पुण्यात पोलिसांच्या प्रतिमेला डाग लावणारी संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील एका दुकानासमोर पोलीस कॉन्स्टेबल नो पार्किंग झोन मध्ये वाहन पार्किंग करत असता दुकानाच्या महिलेने रोखले त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल चिडला आणि महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

महिले ने तिच्या दुकाना समोर वाहन पार्क करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला वाहन नो पार्किंग मध्ये लावू नका असं म्हटलं त्यावरून पोलीस कॉन्स्टेबलने चिडून सदर महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त केले जात आहे. या वर प्रतिक्रिया देत चित्रा वाघ म्हणाल्या 'दुकानासमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावू नका असं सांगणाऱ्या दुकानदार महिलेला पोलीस कॉन्स्टेबलने इजा होई पर्यंत बेदम मारहाण केल्याची अतिशय संतापजनक आणि लज्जास्पद निषेधार्ह घटना घडली आहे. पोलीस रक्षक म्हणवले जातात त्यांनीच असं कृत्य करणं लज्जास्पद आहे. स्त्रीवर हात उगारण्याचा कोणाला अधिकार नाही. महिलेच्या अंगावर मारहाणीचे व्रण आहे. या घटनेची FIR दाखल करून पोलीस कॉन्स्टेबलवर उचित कारवाई करावी.  FIR ऐवजी का NC घेतलीत @CPPuneCity साहेब ??'.
<

दुकानासमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावू नका असं सांगणाऱ्या दुकानदार महिलेला पोलिस कॉन्स्टेबलने इजा होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह अशी घटना पुणे शहरात घडलीये

संकटकाळी ज्यांच्याकडे दाद मागतो त्यांनीच असं कृत्य करणं हे लांच्छनास्पद आहे @CPPuneCity साहेब

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 1, 2022 >
 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी कॉन्स्टेबलच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments