Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पतीच्या आत्महत्येनंतर आता आई, मुलाने केली आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 27 जून 2023 (08:07 IST)
फुरसुंगी, पुणे येथे महिन्यापूर्वी नैराश्य, आजारपण याला कंटाळून एका कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात ७० वर्षांच्या वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगा व आई अत्यवस्थ होते . त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर ते बरे झाल्यावर पुन्हा त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली . त्यात आई व मुलाचा मृत्यू झाला. दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना फुरसुंगीत लक्ष्मी निवास येथे सोमवारी  उघडकीस आली.
 
२२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) यांनी आत्महत्या केली होती. तर शनिवारी  पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे ( वय ६५) आणि मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४५) यांनी  औषध पिऊन आत्महत्या  केली . आज सकाळी शेजारच्यांनी त्यांचा दरवाजा वाजवला .मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना कळवले .पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर आत्महत्या केल्याचे उघडकीस आले .
 
अबनावे कुटुंब गेल्या १० ते १२ वर्षांपासून येथे राहत आहेत. सूर्यप्रकाश हे एका फोटोग्राफरकडे कामाला होते. ते निवृत्त झाले होते , उत्पन्नाचे काही साधन नव्हते . त्यांच्या पत्नीला कॅन्सर झाला. तो अंतिम टप्प्यात होता . मुलगा चेतन याची नोकरी गेली होती . त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. हे संपूर्ण कुटुंब आर्थिक व आजारपणामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकल्याने असा टोकाचा निर्णय घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

उज्जैन महाकाल मंदिराच्या गेटची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच जखमी

बीड जिल्ह्यात 300 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मथुरेतून अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबईत घटस्फोट मागणाऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने एसिड ओतले

दुसरीच्या मुलाचा बळी !, शाळेच्या प्रगतीसाठी घाणेरडे कृत्य

पुढील लेख
Show comments