Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोटच्या मुलीचा आईनेच चाकू भोसकून खून केला पुण्यातील घटना

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (11:16 IST)
असं म्हणतात की आई आणि मुलाचं नातं वेगळेच आहे. मायेचा पदर आपल्या लेकरांसाठी पसरणारी आईचे रूप काही औरच असते. पण पुण्यात  आपल्या पोटच्या मुलीचा चाकू भोसकून क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. वैष्णवी महेश वाढेर असे या चिमुकलीचे नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात मयत वैष्णवीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने खून का केले अद्याप समजू शकले नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हडपसरच्या सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटीत ससाणे नगर येथे एका चिमुकलीचा निर्घृण खून झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनीं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कल्पी आपल्या मुली वैष्णवी सोबत सिद्धिविनायक दुर्वांकुर या सोसायटीत एकटीच राहत होती. बेकरीचे प्रॉडक्ट विकून ती आपला उदरनिर्वाह करायची सोमवारी तिला घरमालकाने घर रिकामे करायला सांगितले  होते. सोमवारी ती राहते घर सोडणार होती. त्यासाठी घरमालक तिच्या घरी गेले असता त्यांनी वारंवार दार ठोठावून देखील आतून दार बंद होते आणि काही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने दार जोरात ढकलले तेव्हा आत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळविले पोलिसांनी आरोपी आईवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून आईला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments