Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे पोलिसात गिरीश महाजन यांची प्रवीण चव्हाणांविरोधात तक्रार

Webdunia
गुरूवार, 24 मार्च 2022 (09:14 IST)
जळगाव  मागील काही दिवसापूर्वी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्हच्या (Pen Drive) माध्यमातून मोठा खुलासा केला होता. यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केला होता. आता या प्रकरणी गिरीश महाजन यांनी पुण्यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडूनच करावी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे. त्यामुळे आता चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याच दिसतं आहे.
 
राज्यातील सरकार विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचत आहे. या कामात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हाताशी धरले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केला होता. याबाबत अध्यक्षांकडे पेन ड्राईव्ह देखील दिला होता. त्यामध्ये १२५ तासांचा डाटा असून, सरकारच्या षड्यंत्राचे पुरावे त्यात असल्याचा दावा त्यांनी केला होता.
 
गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
 
काय आहे प्रकरण?
 
जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, “गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या”, अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments