Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात एका पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 22 जून 2021 (19:06 IST)
पुणे ग्रामीण पोलीस दलात असलेल्या एका शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.या मयत शिपायाचे नाव रज्जाक मोहम्मद मणेरी असं आहे.हा शिपाई पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनात कार्यरत होता. सध्या पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. 
 
रज्जाक इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवासी होता.रज्जाकच्या नातेवाईकांनी कामानिमित्त त्याला बरेच फोन केल्याचे सांगण्यात येत आहे.पण त्याने फोन उचलले नाही त्यामुळे नातेवाईकांना काळजी वाटली आणि ते त्याच्या राहत्या घरी गेले असताना त्यांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले.
 
या घटनेची त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांनी पंचनामा केल्यावर त्यांना मयत असलेल्या रज्जाकच्या शेजारी एक सुसाईड नोट सापडली त्यात त्याने 'सॉरी मॉम' असे लिहिले होते.गळफास घेण्यापूर्वी त्याने नस कापून घेतली नंतर गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे.त्याने हे पाऊल का उचलले अद्याप काही माहिती मिळालेली नाही.पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास घेत आहे.  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

रशिया विरोधात जपानने उचलले मोठे पाऊल; नवीन निर्बंध लादले

सरकारी वाहनेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात', नितीन गडकरी रस्ता सुरक्षा कार्यक्रमात म्हणाले

नागपुरातील मेयो रुग्णालयासाठी निधीची कमतरता भासणार नाही, देवेंद्र फडणवीस

LIVE: रवींद्र चव्हाण यांची भाजपचे कार्याध्यक्षपदी निवड

भाजपने राज्य युनिटमध्ये मोठे बदल केले, रवींद्र चव्हाण यांची भाजपचे कार्याध्यक्षपदी निवड

पुढील लेख
Show comments