Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात कारचालकाने वाहतूक पोलिसास नेले 800 मीटर फरफटत

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:29 IST)
पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची ४०० रुपयांची रक्कम भरण्यास सांगितल्याने एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्याला ७०० ते ८०० मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी प्रशांत श्रीधर कांतावर वय ४३, रा. कन्हैया कॉम्प्लेक्स, महंमदवाडी, हडपसर याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय ४३) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (गु. र. नं. २५३/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड व साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी  फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार दरम्यान घडला.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु  यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते.त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा ४०० रुपयांचा दंड आहे.तो भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित “एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या”असे बोलत दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी  घातली.

अंगावर गाडी येत असल्याचे पाहून त्यांनी बॉनेटवर धरले.ते गाडीवर लटकत आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यांनी हवालदार यांना ७०० ते ८०० मीटर अंतरावर घेऊन गेला.यामध्ये जायभाय यांच्या उजवे हाताचे कोपरास व बोटाला दुखापत झाली आहे.पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments