Marathi Biodata Maker

या मनपा भागातील असलेल्या संभाजीनगर येथे 45 वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र

Webdunia
मंगळवार, 27 एप्रिल 2021 (22:03 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिका दिव्यांग कक्ष व रोटरी क्लब ॲाफ पिंपरी यांच्या सहकार्याने शहरातील 45 वर्षावरील दिव्यांगांसाठी स्वतंत्र कोविड 19 लसीकरण केंद्र रोटरी क्लब सभागृह संभाजीनगर, चिंचवड येथे (बुधवार) पासून सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पात्र दिव्यांग व्यक्तींनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे, आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
 
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोविड 19 लसीकरण केंद्र शहरात विविध ठिकाणी कार्यरत आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून स्वतंत्रपणे लसीकरण केंद्र रोटरी क्लबच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. असा उपक्रम राबविणारी पिंपरी-चिंचवड ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहरात 45 वर्षावरील एकूण 2145 दिव्यांग नागरिक असून ते लसीकरणासाठी पात्र आहेत.
 
नागरवस्ती विभागाकडील दिव्यांग कक्ष विभागाचे उपायुक्त अजय चारठणकर व सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष मेहूल परमार यांच्या समवेत दिव्यांगांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे. सर्व दिव्यांगांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे.
 
लसीकरण केंद्रावर आकुर्डी रूग्णालयाच्या प्रमुख डॅा. सुनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथक कार्यरत असणार आहे. कोविड लसीकरण हे सुरक्षित आहे. या माध्यमातून कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments