Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑफिसमधून तरुणीचे केले अपहरण, अवघ्या सहा तासात पोलिसांनी आरोपी प्रियकराला पकडले

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (07:42 IST)
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी अवघ्या सहा तासाच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केली. शंतनू चिंचवडे (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचे आणि आरोपी शंतनूचे काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप करत संबंध तोडले होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली तरुणी उच्चशिक्षित असून इंटिरिअर डिझायनर आहे. ती एका शॉपमध्ये काम करते. मंगळवारी सकाळी ११.३० सुमारास आरोपी शंतनू ऑफिसमध्ये आला आणि पिस्तुल दाखवून संबंधित तरुणीचे फिल्मीस्टाईल अपहरण केले. तरुणीने आरडाओरड करत मदतीची याचना केली. मात्र, ऑफिसमधील कर्मचारी किंवा इतर व्यक्ती तरुणीच्या मदतीला धावले नाहीत. दरम्यान आरोपीने अॅक्टिव्हावरून तळेगाव परिसर गाठला.
 
दरम्यान, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ चिंचवड पोलीस ठाणे गाठत माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी वेळ न घालवता तपासाची चक्रे फिरवली. शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments