Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूरचा विशाल पिंजानी 'मिस्टर गे इंडिया'

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (20:42 IST)
Instagram
कोल्हापूरचा विशाल पिंजानी 'मिस्टर गे इंडिया' ठरला आहे. 'मिस्टर गे इंडिया' आणि मिस्ट एलजीबीटी यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत त्याने हा किताब पटकावला आहे. तर केरळच्या अभिषेक जयदीप याने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. आता तो मिस्टर वर्ल्ड गे स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. साऊथ आफ्रिका येथील केप टाऊन येथे मिस्टर वर्ल्ड गे स्पर्धा होणार आहे.
 
पुणे येथे 5 ऑक्टोबरला रंगारंग सोहळ्यात कोल्हापूर आणि परिसरात एलजीबीटीक्युआयएप्लस समुदायासाठी 'अभिमान' या स्वयंसहाय्यता गटाद्वारे कार्य करणाऱ्या विशालला सर्व परीक्षकांनी पहिली पसंती दिली. विशालमध्ये लहानपणापासून समलैगिकतेची भावना होत्या. अकरावी, बारावीला असताना मित्रांनी त्रास दिल्याने त्याने शिक्षण सोडले होते. तेव्हा त्याने या चुकीच्या समजाविषयी माहिती घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नसून ती एक नैसर्गिक भावना असल्याचे जाहीर केल्यानंतर घरच्यांनीही विशालला स्वीकारले.
 
विशालने अभिमान या संस्थेमार्फत  2017 पासून कोल्हापूर जिल्ह्यातील काम करायला सुरुवात केली होती. 5 ऑक्टोंबर रोजी पुणे येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवला होता. या सोहळ्यात अनेक समलिंगी पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी शारीरिक तंदुरुस्ती, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा सोबतच एलजीबीटीक्यूआयएप्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निकष होते. भारताच्या विविध प्रांतातून सहभागी झालेल्या स्पर्धकांतून निवडक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले.




















Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

रविवारी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनमध्ये एसीबीचा छापा, दोन पोलिसांना अटक

यवतमाळमधील 104 सेतू केंद्र चालकांना नोटीस, ग्राहकांकडून जास्त पैसे घेतल्याचा आरोप

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

पुढील लेख
Show comments