Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातून लाईट आणि पाणी गायब

bijali
Webdunia
बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (09:15 IST)
पुणे – रावेतच्या 400 KV विद्युत केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातल्या जनतेला आज पाणी पुरवठा तसच वीज संकटाला सामोरं जावं लागणार आहे. लाईटच नसल्यामुळे दोन्ही जुळ्या शहरातल्या पाणी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झालाय. विशेषत: रावेतमधून पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा होता. त्यामुळे त्या शहरातल्या अनेक भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. तसच दोन्ही शहरातून पहाटेपासूनच लाईट गायब आहे. त्याचाही परिणाम शहरातल्या पाणी पुरवठ्यावर होण्याची चिन्हं आहेत.
 
पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

"पायलट बदलला आहे, पण 'विकासाचे विमान' तेच आहे", उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान

हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात ३७ वर्षांनी अटक, १९८८ पासून फरार होता आरोपी

उद्धव ठाकरे नाशिक मध्ये गरजले, 'हिंदुत्व सोडलेले नाही, पण भाजपचे खोटे रूप स्वीकार्य नाही'

LIVE: उद्धव ठाकरे नाशिकमध्ये गर्जना करत म्हणाले हिंदुत्व सोडले नाही

आता विमानांमध्येही मिळणार मोफत वाय-फाय, विमान कंपनीची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments