Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MPSC तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला

Webdunia
मंगळवार, 27 जून 2023 (13:55 IST)
पुण्यातील सदाशिव पेठ येथे MPSC करणाऱ्या तरुणीवर MPSC करत असलेल्या तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. 
 
या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
काही दिवसापूर्वी राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण आताच ताजे असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे घडत असताना मुलीसोबत आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर तरुणी जखमी अवस्थेत धावत होती. आणि तरुण तिच्या मागे कोयता घेऊन धावत होता. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाने कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार तेवढ्यात कोयता पकडला आणि हल्लेखोर युवकाला रोखले. नंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला.
 
या घटनेनंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतल असून अधिक तपास करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

LIVE: छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

नितीन गडकरींचा नागपूर विमानतळाबाबत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

छगन भुजबळांची नाराजी दूर झाली का?भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार!

Shooting: भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन करेल

पुढील लेख
Show comments