rashifal-2026

Pune: दादा 'बर्‍याच दिवसांनी तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात', अमित शहांनी अजित पवारांना म्हटले

Webdunia
रविवार, 6 ऑगस्ट 2023 (17:33 IST)
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा पुण्यात दाखल झाले आहेत. सहकार मंत्रालयाच्या केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलच्या लॉन्च कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. आणि त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी त्यांनी अजित पवारांना गंमतीने सांगितले की, दादा तुम्ही खूप दिवसांनी योग्य ठिकाणी बसला आहात.असं म्हणत त्यांनी सभागृहातील वातावरण सहज केले. त्यांनी असे म्हटल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाटासह हशा पिकला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतली. शाह यांनी कार्यक्रमात सांगितले की, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा (अजित पवार) पहिल्यांदाच आले असून त्यांच्यासोबत मी पहिल्यांदाच स्टेजवर कार्यक्रम करत आहे. मला त्यांना  सांगायचे आहे, दादा तुम्ही खूप कालावधीनंतर योग्य ठिकाणी बसला आहात. जागा बरोबर होती, पण आपण यायला उशीर लावला." त्यांच्या या वक्तव्यावर  सभागृहात हशा पिकला. त्यांनी महाराष्ट्राला देशाची सहकारी राजधानी असे म्हटले. 
 
सहकारी संस्थांची देखरेख करणाऱ्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजिटल होणार आहे. आता कोणत्याही बहुराज्यीय सहकारी संस्थेला शाखा वाढवण्यासाठी, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.
 



Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: मतदानात फेरफार केल्याचा प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

पुणे रिंगरोड प्रकल्पा बाबत दादा भुसे यांनी केली मोठी घोषणा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारचे पाप म्हणत घणाघात

कुपोषणामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूंवरून रोहित पवार यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

IPL 2026 Auction: IPL मिनी लिलाव कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments