Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील उद्याने बंद करण्याचा निर्णय

Pune gardens
Webdunia
गुरूवार, 18 जून 2020 (13:10 IST)
पुण्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुरू केलेली उद्यानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनलॉकमध्ये येथील 33 उद्यानं सुरू केली होती.
 
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची प्रतिकार क्षमता कमी असते आणि बागेत अनेक साधने लोखंडी असल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. तसेच मास्क घालून व्यायाम करणे आरोग्यासाठी फायद्याचे नाही आणि मास्कविना गर्दी करणे योग्य नाही. 
 
उद्याने सुरू झाल्यानंतर सुरक्षाकर्मी, माळी आणि इतर कामाला लोक येथे लावल्यावर यंत्रणेवर ताण वाढेल. अर्थात कोरोनासाठी लावलेल्या मनुष्यबळ यंत्रणेवर ताण पडेल.
 
ही अत्यावश्यक गरज नसल्यामुळे याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. सध्या फिरण्यासाठी टेकडी, मैदाने खुले आहेत, त्यामुळे उद्यान सुरू करण्याचा निर्णय समाजाच्या हिताचा नाही, भविष्य काळात त्याचा विचार करू असं महापौरांकडून सांगण्यात आलं आहे.
 
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10643 इतकी आहे. आतापर्यंत 481 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण 6713 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने फायलींच्या मंजुरीची प्रक्रिया बदलली

मुंबई : मोदी आणि योगींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा

मुंबई सेंट्रलवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

मुंबईत पतीने पत्नीला ४ वर्षे पोटगी दिली नाही, संतप्त वांद्रे न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी घटकांपासून दूर राहण्याचे आवाहन केले

पुढील लेख