Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे-मुंबई प्रवास महागणार; 1 एप्रिलपासून टोल दरवाढ

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2023 (08:48 IST)
पुणे-मुंबई प्रवास आता महागणार आहे. 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. एमएसआरडीसीकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली होती. त्यानुसार, 1 एप्रिल 2023 पासून या महामार्गावरील टोलच्या दरात 18 टक्के वाढ होणार आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील.
 
कसे असतील नवे दर?
दरम्यान, नवीन टोल दरवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांना 50 ते 70 रुपये इतका टोल जास्त द्यावा लागणार आहे. कारचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये, बसचा 795 रुपयांवरुन 940 रुपये होईल. ट्रकचा टोल 580 रुपयांवरुन 685 तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे. थ्री एक्सेलसाठी आता 1380 रुपये मोजावे लागतात. नव्या दरानुसार 1630 रुपये मोजावे लागतील. तर एमएक्सेलसाठी 1835 ऐवजी 2165 रुपये टोल द्यावा लागेल.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments