Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे: पैशांचा पाऊस! भोंदू बाबाने तरूणाला घातला 18 लाखाचा गंडा...

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (20:19 IST)
पुणे हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं, मात्र आता शिक्षणाची नगरी की, जादू टोण्याची नगरी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पैशांचा पाऊस पडतो म्हणून पुण्यातील हडपसर परिसरातील एका तरुणाला मांत्रिकाने तब्बल अठरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत मांत्रिकाने तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रमार्फत एका भोंदू बाबा याच्याशी ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली.
 
दरम्यान  पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलीस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला असल्याचे समजताच फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत
 
या प्रकरणी भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे , रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. तर अशी गोष्टींना बळी बडू नका असे आवाहन पोलीस आणि अंधश्रध्दा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments