rashifal-2026

Pune : पुण्यात एकाच ट्रॅकवर दोन मेट्रो, मेट्रो प्रशासन म्हणते...

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (20:42 IST)
Pune :पुणे मेट्रो कोणत्या न कोणत्या कारणात्सव चर्चेत असतात. एकाच ट्रॅकवर दोन मेट्रो आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर घटना छत्रपती शिवाजी नगर परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पुणे मेट्रोने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.पुणे मेट्रोने असे काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे. 
 
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एकाच ट्रॅक वर एक मेट्रो उभी असताना दुसरी मेट्रो येतांना दिसत आहे. सुदैवाने वेगात आलेल्या मेट्रो चालकाने ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. एका नागरिकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. 
 
या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना पुणे मेट्रोने माहिती दिली असून मेट्रोचे अधिकाऱ्यांनी सांगितले की,मेट्रोचा हा व्हिडीओ खालून घेतलेला असून दोन्ही मेट्रो एकाच ट्रॅक वर असल्याचा भास होत आहे. पण वास्तवात या दोन्ही मेट्रो वेगवेगळ्या मार्गावर आहे. सध्या मेट्रोची हॉर्न वाजवण्याची चाचणी सुरु असून मेट्रो डेपोमध्ये ये जा करत आहे. एक मेट्रो डेपोत जात आहे तर दुसरी मेट्रो डेपोतून मुख्य मार्गावर येत आहे.  
 


Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अमेरिकेने आणखी एका बोटीला लक्ष्य केले, 87 जणांचा मृत्यू

घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पत्नीने भावाच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीची केली हत्या; चार जणांना अटक

IND vs SA ODI: शनिवारच्या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विशाखापट्टणममध्ये दाखल

IIM इंदूर येथे प्लेसमेंटच्या नावाखाली मुलींशी गैरवर्तन

LIVE: नगरपंचायत निवडणुकीत १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला

पुढील लेख
Show comments