Dharma Sangrah

पुणे अनलॉक; मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय

Webdunia
शुक्रवार, 11 जून 2021 (12:47 IST)
पुण्यातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा करत आता मॉल्स आणि दुकांन उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉल्सबरोबर दुकानं ७ वाजेपर्यंत, तर रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. येत्या सोमवारपासून हे निर्णय लागू होणार आहे. मात्र, पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होईल, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन यात निर्बध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अजित पवार यांनी नियमांची माहिती दिली. सोमवारपासून या नियमावलीचं पालन करून मॉल्स सुरू करण्यास तसेच दुकानंही ४ वाजेऐवजी ७ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेस्तराँ आणि हॉटेल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
हे नियम सोमवारपासून लागू होणार असले तरी यापूर्वी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. त्याबद्दल स्पष्ट करत अजित पवारांनी म्हटले की पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर हे लागू केलं जाईल, अन्यथा निर्णय बदलावा लागेल. त्यांनी पुणेकरांना आवाहन केले  की, त्यांनी नियमांचं पालन करावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या वजनदार खात्यांवरून वाद, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा... संघर्ष वाढण्याची शक्यता

पाकिस्तान कंगालीच्या दिशेने ! प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीवर ₹३.३३ लाखांचे कर्ज

NCP साठी अजित पवारांनी योजना आखल्या होत्या! जवळच्या मित्राने पक्षाचे गुपिते उघड केले, त्यांची शेवटची इच्छा सांगितली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फडणवीस यांना भेटले, अजित पवार यांच्या खात्यांवर दावा केला, सुनेत्रा पवार यांच्या नावाचीही चर्चा

साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू: पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अनेक गुपिते उघड करेल का?

पुढील लेख
Show comments