Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट

Pune
, सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (10:04 IST)
पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दर्शवला आहे. शिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 
 
भारतीय हवामान विभागानं 24 तासांत कमीतकमी 204.5 मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सतारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावासाचा अंदाज आहे. तसेच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार असून या दोन विभागासह राज्यात इतरत्र 22 ऑगस्टपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. राज्यातील पाऊस आता सरासरीच्या पुढे गेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Viral Video: बुरखाधारी महिलेने केला गणेशमूर्तीचा अवमान, गुन्हा दाखल