Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुंड शरद मोहोळची दोन महिन्यासाठी पुणे शहरातून तडीपार

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (07:50 IST)
कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात उपस्थित राहताना आरडाओरडा करीत परिसरात दशहत माजविणाऱ्या  गँगस्टर शरद मोहोळ (रा. सुतारदरा, कोथरूड) याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रवेश करण्यासह राहण्यास दोन महिन्यांची मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे.
 
गुरूवार पेठ परिसरात 26 जानेवारीला एका संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त गँगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे 10 ते 12 साथीदार आरडाओरडा करीत हजर झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर नागरिक भीतीने पळून गेले होते. कोरोना कालावधीतही नियमांचे पालन न करता मोहोळ टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे त्याच्यासह साथीदारांविरूद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 16 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार गँगस्टर शरद मोहोळ याला शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणे आणि राहण्यावर दोन महिने सक्त मनाई करण्याचा आदेश 4 मार्चला पारित करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पुढील लेख
Show comments