Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे 400 हून जास्त विद्यार्थ्यांसह कर्मचारी क्वारंटाईन

Webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (07:44 IST)
पुणे महापालिकेच्या कोंढव्यातील शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे 400 हून जास्त विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे  उघडकीस आले. त्यामुळे ‘त्या’ शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांसह अन्य शिक्षक, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून लवकरच सर्वांच्या कोरोना स्वॅब चाचण्या केल्या जाणार आहेत. तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
संत गाडगे महाराज शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग भरतात. शाळेत विविध सहा तुकड्यांमधील साडेअकराशे विद्यार्थी आणि 55 शिक्षक-इतर कर्मचारी आहेत. मात्र, शाळा सुरू झाल्यापासून केवळ सव्वाचारशे विद्यार्थी शाळेत उपस्थितीत राहात आहेत. शाळेतील वर्गखोल्यांसह इमारत आणि मैदानाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. गरजेनुसार शिक्षण आणि विद्यार्थ्यांची तपासणी करू. मात्र संबंधित शिक्षकाची चार दिवस सुटी होती. त्यामुळे ते कोणाच्या संपर्कात नव्हते, असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

राज्य आर्थिक संकटातून जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

आज मुंबई रामनामाने गुंजणार, श्री रामलला मूर्तीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments