Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खडकवासला मतदार संघातील तब्बल 32 हजार 124 मतदारांची नावे वगळली जाणार

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:03 IST)
पुण्यातील खडकवासला मतदार संघातील मतदार याद्यांचे शुध्दीकरणात्मकाचे काम सुरु आहे.या मतदारसंघात जवळपास 4 लाख 95 हजार 976 इतक्या मतदारांची संख्या आहे. तर त्यामधील 32 हजार 124 नावे यादीतून  कट करण्यात आली आहे.विधानसभा मतदार संघातील मतदार यादी शुध्दीकरण अंतर्गत छायाचित्र नाहीत आणि ज्यांची दुबार अर्थात 2 वेळा नावे असलेले हे 32,124 मतदारांची संख्या रद्द होणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी आणि हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले आणि हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते  यांनीृ याबाबत माहिती दिली आहे.
 
उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी माहिती दिली आहे की,1 हजार 309 मतदारांची नावे दुबार आहेत. त्यामुळे मतदार यादी शुध्दीकरण अंतर्गत ही सर्व नावे वगळण्यात येणार आहेत.अनेक नागरिक कुटूंबातील सदस्याची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी पुढे येतात ही सकारात्मक बाब आहे.मात्र कुटुंबातील सदस्य मयत झाल्यास,स्थलांतर किंवा मुलीचे विवाह झाल्यास फॉर्म क्र.7 भरून नाव वगळणी करत नाहीत. त्यामुळे मतदार यादी वाढत जाते त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे नागरीकांनी नावे वगळण्यासाठी सुध्दा अर्ज करणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
 
राज्यातील विधानसभा मतदार संघातील मतदार यादी शुध्दीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.याअंतर्गत मतदार संघातील दुबार मतदार असलेल्यांची नावे वगळण्यात येत आहे. दरम्यान, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे,नावात,पत्त्यात,वयात दुरुस्ती करणे,मतदार ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करणे,मतदार संघ बदलणे तसेच स्थलांतर करण्यासाठी 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत असणार आहे. त्यानंतर, 1 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात केली जाणार आहे.दरम्यान, मतदार यादीत अनेकांची छायाचित्र नाहीत.अशा मतदारांची घरोघरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शहानिशा करीत आहेत.अशी माहिती आसवले यांनी दिली आहे.
 
फॉर्म प्रक्रिया –
 
– मतदार यादीत फोटो नसणे, माहिती पुर्ण नसणे तसेच पत्ता अद्यावत नसणे इत्यादीबाबत फॉर्म नमुना क्र. 8 भरून कागदपत्रे कार्यालयात जमा करावेत.
 
– किंवा www.nvsp.in या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म नमुना नं. 8 भरावा.
 
– स्थलांतर झालेले, दुबार, मयत, मतदारांची नावे वगळण्याकामी नमुना नं. 7 चा फॉर्म भरणे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments