Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पतीला नपुंसक करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने रचला कट, वाचा कसा उघड झाला हा प्रकार

Webdunia
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (15:51 IST)
प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक करण्याचा पत्नी व प्रियकराचा कट उघड झाला आहे. पत्नीच्या प्रियकराचे त्याच्या मोबाईलमधील चॅट पाहिल्याने हा सर्व प्रकार पतीच्या लक्षात आला. पुण्यातील वारजे पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पत्नी ही पुणे येथील एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर आहे. नोकरी दरम्यान तिचे त्याच कंपनीत काम करणा-या एका तरुणासोबत सुत जुळले. मात्र लग्न करण्यास त्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
 
काही दिवसांनी तिचे एका सॉफ्टवेअर अभियंत्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर दोघे पती पत्नी वारजे येथे भाड्याच्या खोलीत राहू लागले. एकाच कंपनीत कामाला असल्यामुळे त्या तरुणाच्या पत्नीचे व तिच्या पुर्वाश्रमीच्या प्रियकराचे पुन्हा सुत जुळले. दोघांचे लग्न होवू शकले नव्हते. त्यांनी कट रचून तिच्या पतीला जखमी करुन नपुसक करण्याचे ठरवले. दोघे पती पत्नी हनीमुनच्या निमित्ताने महाबळेश्वर येथे गेले होते. त्या ठिकाणी तिचा प्रियकर देखील तेथे आलेला होता. प्रियकर देखील त्याच परिसरात रहात असल्यामुळे तिघे एकत्र भेटले. पत्नीने त्याची ओळख पतीसोबत करुन दिली. लॉकडाऊन मधे त्याची नोकरी गेल्याचे तिने पतीला सांगून त्याला सोबत राहण्यास बोलावले.
 
त्यानुसार तो प्रियकर दोघा पती पत्नीसमवेत राहण्यास आला. महाबळेश्वर येथील हनीमूनचे फोटो बघण्यासाठी पतीने पत्नीचा मोबाईल तपासला असता त्याला काही फोटो संशयास्पद दिसून आले. रात्री सर्वजण झोपल्यानंतर त्याने प्रियकराचा मोबाईल तपासला असता त्याला पत्नी व त्याच्यातील झालेले चॅट आढळून आले. त्या चॅट दरम्यान दोघे प्रियकर व प्रेयसी असल्याचे पतीच्या लक्षात आले. दोघांनी मिळून त्याला नपुसक करण्याचा कट रचला होता. घरात चोरी झाल्याचा बनाव करुन पतीला जखमी करुन नपुसंक करण्याची चर्चा त्या चॅटमधे झालेली होती. 
 
हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे पतीने कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे कारण पुढे करत तो आपल्या मूळ गावी परत आला. सर्वांसोबत विचार विनीमय केल्यानंतर त्याने थेट वारजे माळवाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनला आल्यावर त्याने पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध फिर्याद दाखल केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments