Dharma Sangrah

वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी; 'सावध राहा रुपेश'!

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2022 (13:46 IST)
पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. रुपेश मोरे यांच्या गाड़ीवर 'सावध राहा रुपेश' असा मजकूर लिहिलेली चिट्ठी अज्ञाताने ठेवल्यावर या प्रकरणाची तक्रार वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली. 
 
या प्रकरणात अधिक माहिती अशी की, वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ते कात्रज परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. दरम्यान या कार्यक्रमाच्या वसंत मोरे यांच्या मुलाच्या रुपेश मोरे यांच्या गाडीवर अज्ञाताने धमकी दिलेली चिट्ठी मिळाली.या संदर्भात मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आता  ही धमकीची चिट्ठी कोणी लिहिली हे शोधण्याचे आव्हाहन पोलिसाच्या पुढे आहे. 
 
या वर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली की, मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप हा प्रत्येक मुलासाठी आयडॉल असतो. आमचे ही तसच आहे पण हे कोणाला का खटकतंय तेच समजत नाही. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणीतरी आपल्या कुटुंबाबतीत असा विचार करायचा असं का? तेच कळत नाही. पोलीस ह्याचा शोध घेतच आहे. धमकी देणारा जो कोणी असेल त्याने लक्षात ठेवावं की  त्याचा बाप वसंत मोरे आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

पुण्यात १३ वर्षांच्या मुलीवर आईच्या मित्राकडून चालत्या गाडीत दुष्कर्म

देशभरात SIR बाबत एक मोठी घोषणा, आता ती या २३ राज्यांमध्ये करण्यात येणार

रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येईल; या योजनेमुळे प्रवाशांना दिलासा

ठाणे जिल्ह्यात लाच घेतल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला अटक

LIVE: ठाणे 'मोबिलिटी हब' आणि कल्याण 'स्मार्ट सिटी' बनणार

पुढील लेख
Show comments