Marathi Biodata Maker

वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 7 मार्च 2026 (19:26 IST)
सोशल मीडियाचा वापर करणे पुण्याचे माजी नगर सेवक वसंत मोरे यांना चांगलेच भोवले आहे. फेसबुकवर प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान पोस्ट केल्याने ते अडचणीत सापडले आहे. त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. 
ALSO READ: "मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही..." नितीन गडकरी यांचे स्पष्ट शब्द; पेट्रोलियम लॉबीला इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट दोन गटांत तेढ निर्माण करणारी होती. तसेच या पोस्टमुळे शांतता भंग होण्याची शक्यता होती. या पोस्ट मुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे निदर्शनास आल्यावर पुणे पोलीस सक्रिय झाली आणि प्रकरणाची गंभीर दखल घेतली. 
ALSO READ: पुणे मुंढवा जमीन प्रकरणात निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची विभागीय चौकशी सुरू
पोलिसांनी चिथावणीखोर विधान केल्याबद्दल चौकशीअंती भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत वंसत मोरे यांचावर गुन्हा दाखल केला आहे. सायबर शाखेच्या मदतीने या पोस्टच्या तांत्रिक बाबींचीही तपासणी केली जात आहे.
ALSO READ: पुण्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकार, नागरिकाला 10 कोटींना लुटले दोघांना अटक
या कायदेशीर कारवाईमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे,” असे मत पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले! महाराष्ट्रातील १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या दोन मित्रांचा गूढ मृत्यू; धुळ्यात भोंदूबाबाने घेतला दोघांचा बळी

कोण आहेत RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सर ? NEET पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात CBI च्या ताब्यात, चौकशी सुरु

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: शाळांचे हस्तांतरण यापुढे मनमानीपणे करता येणार नाही

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीस यांनी नाकारले 'कान्स' महोत्सवाचे निमंत्रण

पुढील लेख
Show comments