साहित्य - कोबी - १ वाटी किसुन घ्याव ा, कांदा - १ मोठा किसलेल ा, क ोथिंबीर - आर्धा कप बारीक चिरलेल ी, डाळीचे पीठ - २ वाट ी, साखर चवीनुसा र, गरम मसाला पावडर - १/२ टी-स्पू न, हिरव्या मिरच्या - ४ ते ५, मीठ, हळद, जिर े, तेल - मोहनासाठी १ टी-स्पून व तळण्यासाठी आवश्यकतेनुसा र, लिंबू १/ २, हिंग - चिमूटभ र.
कृती- सर्वप्रथम कोबी व कांदा किसून घ्यावा त्यात मिरच्या, कोथिंबी र, गरम मसाला, हळद, जिरे, डाळीचे पीठ सर्व साहित्य एकत्र करावे, त्यावर लिंबू पिळावे. पाणी वापरू नये. कोबी, कांदा व क ोथिंबीर यांचा ओलेपणा पीठ भिजवण्यास पुरेसा असतो. सरसरीत पीठ करून घ्यावे व हाताच्या तळव्यांना किंचित तेल लावून डाळ व वडय़ाप्रमाणे छोटे-छोटे चपटे वडे करून घ्यावेत. गरम तेलात भज्यांप्रमाणे कोबीचे वडे तळावेत आणि गरम सव्र्ह करावे.